Skip to main content

Posts

स्मरणशक्ती – एक चिंतन

एखादी गोष्ट, ओळ, कविता, सुभाषित किंवा इतर तपशील, स्मरणात ठेवण्याच्या आपल्या स्वतःच्या प्रक्रियेचा आपण किती वेळात जाणीवपूर्वक विचार करतो? म्हणजे ज्या गोष्टी आपल्या लक्षात राहतात त्या ‘का’ राहतात? त्यासाठी आपण काय केलेले असते?   ते इतर गोष्टींच्या बाबतीत आपल्याला हुकमी पद्धतीने करता येऊ शकते का? येऊ शकेल का?   तसेच या उलट, ज्या गोष्टी आपली इच्छा असूनही लक्षात राहत नाहीत त्या ‘का’ राहात नाहीत? या व अशा प्रश्नांचा यात समावेश होईल माझ्या स्वतःच्या बाबतीत हा विचार करू जाता मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे जी गोष्ट लक्षात ठेवायची, त्याची काही तार्किक संगती लागल्याशिवाय ती गोष्ट माझ्या लक्षात राहात नाही. विशेषतः काव्यपंक्तिंच्या किंवा सुभाषितांच्या बाबतीत, अनेक वेळा गद्य वाक्यांच्या, थोरामोठ्यांच्या उक्तिंच्या बाबतीत सुद्धा, त्या लक्षात ठेवण्याची प्रक्रिया बहुदा पुढील प्रमाणे होते - मूळ वाचनाचा / पंक्तींचा अर्थ समजावून घेणे त्यामधील विचारांचा प्रवाह कसा वाहतो त्याचे आकलन करून घेणे त्या प्रवाहाचे जे काही नैसर्गिक विभाग होतात, ते विभाग, म्हणजेच पंक्तिंचे तुकडे समजून घेणे त...

मृत्यूचा मृत्यू

लता गेली. पण म्हणजे नेमकं काय झालं ? तिची गाणी , त्यातून तिने निर्माण केलेलं विश्व तसच आहे ना ? ते कुठेच गेलं नाहीए. जाणारही नाहीए. हवी तेव्हा ती गाणी ऐकता येणारच आहेत की? त्यात तिचा तोच सूर , तीच आर्तता , तोच नेमकेपणा , तीच जादू , तेच संगीत , तोच नॉस्टॅल्जिया असणार आहे. तिची ‘नवीन’ गाणी ऐकायला मिळणार नाहीत म्हणायची तर तिने गाणं थांबवून आता उणीपुरी वीस वर्षं होत आली होती. म्हणजे तिच्या जाण्याने नवीन चांगली गाणी आता येणार नाहीत असंही नाही. बरं , वैयक्तिक ऋणानुबंध म्हणाल तर तोही नाही. प्रत्यक्ष परिचय नाही. कधी कुठे एकत्र काम केलय असही नाही. मग लता ‘गेली’ म्हणजे नेमकं काय झालं ? ही बातमी ऐकल्यावर नि:शब्द , सुन्न होण्यासारखं नेमकं काय घडलंय ? तिच्या जीर्ण झालेलं शरीरानं आणखी किती वर्षं तग धरायला हवा होता ? ‘ वासांसि जीर्णानि...’ हे तिच्या बाबतीत खरं नाही का ? की कुणाच्याही मृत्यूने होते तशी आपल्या स्वत:च्या मर्त्यपणाची जाणीव याही मृत्यूने आपल्याला झाली इतकंच ? ❖❖❖ इयत्ता नववीत असताना मी व मा‍झ्या आतेभावाने जुनी गाणी ऐकायला व जमवायला सुरुवात केली. तेव्हापासून पुढची अनेक ...

Death of a death

Lata is   gone . But what does it mean? Her songs, the universe she weaved through them, is still here, isn’t it? It is not going anywhere. Her songs are available to us to listen to them, whenever we wish. They will have the same sur, intensity, precision, magic, music, and nostalgia they always had. It is not about her 'new' songs either. She had stopped singing for almost two decades now. So, it is not that we were going to miss 'new' songs sung by her. It is also not about any personal connections. We were not acquainted with each other. We never worked together on any project. So,  what does  'gone'  mean? Why should the news of her passing make me speechless, vacant, barren, desolate? How long was her withered body supposed to hold on? Does  Vasaansee jeerNaane   not apply to her? Or is it that her death only reminds me of my own mortality, just as the death of anyone else would? Is that all? ***********************************************************...

राजा शिवछत्रपती आणि बाबासाहेब

मी शाळेत असताना जे लेखक वाचत मोठा झालो, ज्यांची पुस्तकं वेड्यासारखी वाचली, परत-परत वाचली, ज्यांनी माझं लहानपण अक्षरश: घडवलं, त्या हाताच्या बोटांवर मोजण्यासारख्या चार-पाच लेखकांमध्ये बाबासाहेब होते. त्यांचं ‘राजा शिवछत्रपती’ मी इतक्या वेळा वाचलंय की त्याला गणतीच नाही. माझ्याकडे आज असलेली त्याची प्रत, ही तिसरी प्रत आहे. त्याच्या पहिल्या दोन प्रती मी इतक्या वेळा वाचल्या आहेत, की वाचून-वाचून त्याचं पान अन् पान सुटं होऊन त्या खराब झाल्या. तिसर्‍या प्रतीचीही अवस्था काही फार वेगळी नाहीये. इतिहास म्हणजे काय? इतिहासाचा अभ्यास कसा करायचा असतो? त्याच्यातलं खरं-खोटं काय? पुरावे कोणते? त्याच्या मागच्या राजकीय विचारधारा काय आहेत? इतर सिद्धांत कुठले? हा सगळा विचार खूप-खूप नंतर आला. या सगळ्याच्या आधी 'शि-वा-जी' या तीन अक्षरांबद्दल प्रेम, आदर, आपलेपणा, खरं तर भक्ती निर्माण करण्याचं काम बाबासाहेबांच्या 'राजा शिवछत्रपती'ने केलं. शिवाजी महाराजांना आमच्या आयुष्याचाच नाही तर, व्यक्तिमत्वाचा, अगदी रक्ताचा भाग बनवण्याचे काम या पुस्तकाने केलं. त्या काळात वाचलेल्या कुठल्याही खऱ्या किंवा काल्पनिक...

सुमनआत्या...

वडीलधार्‍या माणसांच्या संस्काराचे मोल कळण्यासाठी आपल्या स्वत:ला , बहुधा, अगदी वडीलधारे नाही , पण किमान प्रौढ तरी व्हावे लागते. दुर्दैव हे , की तो पर्यंत आपल्यावर   संस्कार करणारी वडीलधारी माणसे वृद्ध झालेली असतात , आणि अनेकदा कायमची निघूनही गेलेली असतात. त्या संस्कारांचे ऋण त्यांच्यापुढे व्यक्त करणे मग राहून जाते , ते कायमचेच. २८ जूनला आत्या गेली. जवळजवळ सहस्रचंद्रदर्शन करून , नंतर एका फार मोठ्या आजाराला वर्ष-दीड वर्ष मोठ्या धैर्याने तोंड देऊन गेली. मिळालेल्या दीर्घायुष्याचा , मला ठाऊक असलेल्या बहुतेकांपेक्षा, अधिक चांगला उपयोग करून गेली. पण तरीही तिने केलेल्या संस्कारांचे ऋण व्यक्त करण्याचे राहूनच गेले. आत्या ‘उच्चविद्याविभूषित’ म्हणतात तशी होती. इतकंच नव्हे तर संशोधक, विचारवंत आणि शिक्षणतज्ञ होती. एखाद्या विषयाची साग्रसंगीत , सांगोपांग , सखोल , तर्क-विवेकाने , चिकित्सा करून ती अभ्यासपूर्ण भाषेत मांडणारी होती. अर्थातच तिने मला शिकवलेल्या गोष्टींमध्ये वैचारिक , बौद्धिक गोष्टी तर होत्याच. पण मी तसा, लौकिकार्थाने, डॉ. सुमन करंदीकरांचा विद्यार्थी नाही. ‘आपणच’शी माझा संबंध असला तरी...

राष्ट्रभाषा संस्कृत

एखादी भाषा राष्ट्रभाषा केली म्हणजे ती वापरली जायलाच हवी असे का? ते स्थान केवळ प्रतिकात्मक किंवा एकूण इतिहासाचा / संस्कृतीचा विचार करता दिलेल्या सन्मानाचे स्थान असू शकत नाही का?   थोडं गमतीनं सांगायचं तर – आपला राष्ट्रीय प्राणी वाघ आहे म्हणून तो प्रत्येकाने पाळावा अशी अपेक्षा त्या सन्मानामागे आहे का? किंवा तो संख्येने सर्वाधिक असलेला प्राणी असला पाहिजे असा अट्टाहास आपण धरतो का?  राष्ट्रभाषा ही भावनिक गोष्ट आहे – व्यावहारिक नाही – ही गोष्ट मुळात लक्षात घ्यायला हवी असे मला वाटते.   संस्कृत व्यवहारात स्वीकारावी, किंवा शासनाने ती स्वीकारली जावी यासाठी काही विशेष प्रयत्न करावे असे मी म्हणत नाही. व्यावहारिक अर्थाने कोणतीही भाषा भारत ‘राष्ट्रभाषा’ म्हणून स्वीकारू शकत नाही हे आपल्यातील विविधतेमुळे उघड आहे. पण तो मूळ मुद्दा नाहीच आहे. व्यवहारात लोक व्यवहाराला योग्य ती भाषाच वापरतात. उद्या सर्वाधिक पगाराची नोकरी मिळविण्यासाठी संस्कृतच्या ज्ञानाची गरज निर्माण झाली तर आज आयआयटी चे क्लासेस चालवणारे तत्काळ संस्कृतचे क्लासेस चालवायला लागतील. व सगळे विद्यार्थी ही चर्चा बंद करून तिकडे...

Tierno Bokar

Yesterday evening I had another wonderful opportunity to see a play called   'Tierno Bokar'. It was directed by Peter Brook. He was in New York for last month conducting a workshop at the Columbia University. This play was the outcome of that workshop. Tierno Bokar was a Sufi 'sage' from West Africa who lived in the last century. He was a wise man and a voice of tolerance when his country and continent were consumed with religion and politics-based violence. One of his students, Amadou Hamapaté Bâ, who is apparently a great writer and has been a guiding light to UNESCO after Mali’s independence in 1960 (I had not even heard this name until yesterday… but that only shows how ignorant I am) has written a book about his master. The book is titled ‘The Life and Teaching of Tierno Bokar - The Sage of Bandiagara’. The play was based on this book. The performance itself took place in gymnasium of a one of the Columbia University colleges. They had converted it into an ...

An Evening with Amitabh Bachchan

Yesterday evening I had one of the most surreal experiences of my life. I saw Amitabh Bachchan ! Real.... exactly as Einstein had said about Gandhi.... 'such a one ever in flesh and blood... ' This was at a retrospective of his films that was organized by the Lincoln Center Film Society. Yesterday's event... 'An Evening with Amitabh Bachchan' was the culmination of that festival. He appeared in person and was interviewed for over two hours. He spoke about many things, his movies, his image as 'angry young man', his favorites stars, politics, his financial troubles, his second innings... The event began with a short documentary on him... it started with the narration by its creator about when he started watching Hindi films and what it means to him... it started with a troop of traditional artists telling a mythological story using an old painting... with a typical Rajasthani folk music as background... It was intermixed with famous writers .... Salman Rashdi...