आपल्याकडे षड्दर्शनांची परंपरा आहे. त्या दर्शनांमध्ये त्या काळात तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात जो सर्वोच्च विचार झाला त्याची वेगवेगळ्या दृष्टीने केलेली मांडणी आहे. विश्वाचं जे काही सत्य स्वरूप आहे त्याच्या वेगवेगळ्या पैलूंच ‘ दर्शन ’ आहे. हिंदी चित्रपटसंगीताच्या सुवर्णयुगात जे स्त्री आणि पुरुष गायक होऊन गेले , त्यांनीही स्त्री आणि पुरुषांच्या भावनिक अभिव्यक्तीच्या वेगवेगळ्या पैलूंचं दर्शन आपापल्या गाण्यातून लोकांना घडवून दिलं. तेव्हा त्या दर्शनांसारखी आपण यातलीही सहा पुरुष आणि सहा स्त्री दर्शनं निवडली तर ? निकष अर्थातच हा , की आपल्या असामान्य अश्या अंगभूत गुणांनी , आणि अगणित कष्टांनी त्यांनी पार्श्वसंगीताच्या क्षेत्रात सर्वोच्च असं काय करणं शक्य आहे ते आपल्या कर्तृत्वानं दाखवून दिलेलं असावं. अशी निवड करायची म्हंटलं तर पुरुष गायकांमध्ये रफी , मुकेश , किशोर , हेमंत , तलत , आणि मन्ना डे या सहा जणांचा समावेश होईल याबद्दल फारसे मतभेद असण्याचं कारण नाही. स्त्री गायकांमध्ये माझ्या यादीत , लता , नूरजहाँ , काननदेवी , आशा , शमशाद आणि गीता यांचा समावेश मी करेन. अर्थातच हा वैयक्तिक ...
Extroversions of an Introvert Mind