Skip to main content

Posts

आशाताई...

आपल्याकडे षड्‍दर्शनांची परंपरा आहे. त्यात आस्तिक आणि नास्तिक अशी सहा-सहा दर्शनं मानली आहेत. त्या दर्शनांमध्ये त्या काळात तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात जो सर्वोच्च विचार झाला त्याची वेगवेगळ्या दृष्टीने केलेली मांडणी आहे, त्या विचाराच्या वेगवेगळ्या पैलूंच दर्शन आहे. त्याच पद्धतीने जर हिंदी चित्रपटसंगीताच्या सुवर्णयुगात स्त्री आणि पुरुषांच्या भावनिक अभिव्यक्तीच्या सर्वोच्च पातळीचं दर्शन घडविणारे सहा पुरुष आणि सहा स्त्री गायक निवडले तर? निकष अर्थातच हा, की आपल्या असामान्य अश्या अंगभूत गुणांनी, आणि अगणित कष्टांनी त्यांनी त्या क्षेत्रात सर्वोच्च असं काय करणं शक्य आहे ते आपल्या कर्तृत्वानं दाखवून दिलेलं असावं. अशी निवड करायची म्हंटलं तर पुरुष गायकांमध्ये रफी, मुकेश, किशोर, हेमंत, तलत, आणि मन्ना डे या सहा जणांचा समावेश होईल याबद्दल फारसे मतभेद असण्याचं कारण नाही – मात्र तरीही हे माझं वैयक्तिक मत आहे याचं भान मी ठेवून आहे.   स्त्री गायकांमध्ये माझ्या यादीत, लता, नूरजहाँ, काननदेवी, आशा, शमशाद आणि गीता यांचा समावेश मी करेन. अर्थातच हा वैयक्तिक आवडी-निवडीचा भाग आहे, यात मतभेद असू शकतात, हे मल...
Recent posts

वारसा

“ एअरपोर्टला जाण्यासाठीची टॅक्सी आत्ता तासभरात येईल. तू खरंच ‘आत्ता’ तिला भेटायला जाणार आहेस का ? ”   मी तसा महिन्याभरातच परत येण्याच्या हिशोबानी प्रवासाला निघालो होतो. त्यामुळे अगदी तातडीनं तिला आजच भेटण्याची काही आवश्यकता होतीच असं नाही. तिचं वय खूप झालं होतं, ती थकली होती, हे खरंच.. पण मग काय झालं, महिनाभरानी भेटूच असं म्हणता आलं असतं. पण त्या दिवशी का कुणास ठाऊक, मला असं वाटलं की जाऊन यावंच. तिला भेटलो. पाऊण-एक तास छान गप्पा झाल्या. नेहमीच व्हायच्या. तिला माझ्याबद्दल असलेली माया, प्रेम, कौतुक विलक्षण होतं. ती मायाळू होतीच आणि मलाही मागच्या पिढीबद्दल खूप भावनिक जवळीक वाटते, पण त्याही पलीकडे जाऊन आम्हाला एकमेकांबद्दल वाटणारी जवळीक विलक्षण होती. आमच्या त्या शेवटच्या भेटीला उणेपुरे दोन आठवडेही झाले नसतील आणि काल ती गेली. त्या दिवशी तिला भेटायला जायची मला झालेली तीव्र जाणीव ही जणू काही नियतीच्या अटळ पावलांची माझ्या हितकर्त्या देवतांनी मला दिलेली पूर्वसूचनाच होती असं आता म्हणायला पाहिजे. माझ्या वडीलांची मोठी बहीण. त्यांच्या पिढीतल्या सहा भावंडांपैकी शेवटची शिल्लक असलेली सिंधुआत्...

तुझिये निढळीं...

हे संत ज्ञानदेवांचं भजन - तुझिये निढळीं... एका प्रकट कार्यक्रमात बालगंधर्वांनी गायलेलं ध्वनिमुद्रण आहे हे.  जुनं आणि प्रकट कार्यक्रमातलं असल्यामुळे फार चांगलं नाहीये. पण त्याच्या सगळ्या बाह्य दोषांतून आणि मर्यादांतूनही त्याचं सौंदर्य आणि त्याची शक्ती दोन्ही पूर्ण प्रकट होतात हा माझा अनुभव आहे.  हे म्हणजे वेरूळच्या आजच्या भग्न मूर्तीकडे पाहावं आणि ती तिच्या मूळ स्वरूपात दिसावी तसं आहे थोडंसं... भगवंतांनी गीतेत म्हंटलं आहे - यः पश्यसि स पश्यसि - ज्याला दिसतं त्याला दिसतं.... तसं काहीसं.  ही चाल मास्तरांची... मा. कृष्णरावांची... आहे. त्यांची स्वतःची या गाण्याची उत्तम ध्वनिमुद्रण असलेली ध्वनिमुद्रिका आहे. माझ्याकडे आहे.  छान आहे.   पण हे ऐकल्यानंतर पुन्हा 'त्यांचं' ऐकावं अशी इच्छा मला झालेली नाही.  संगीतकाराने स्वतः गायलेलं गाणं हे कोणत्याही गायकाने गायलेल्या आवृत्तीपेक्षा सरस असतं म्हणतात. शंभरातल्या नव्व्याण्णव वेळा ते खरंही आहे. पण काही गायकांच्या गळ्याला अद्भुताचा, परतत्त्वाचा स्पर्श असतो. त्यातून व्यक्त होणारा आवाज त्या स्पर्शामुळे एक वेगळी अनुभूती दे...

Swa. Savarkar's Ode to Liberty - jayostu te shri mahanmagale

On this happy occasion of India's 78th Independence day, sharing a loose translation of a great Marathi poem by Swatantryaveer Vinayak Damodar Savarkar. This poem and its musical avatar have both been quite famous in the Marathi world. However, the difficulty in accessing its rich and poetic Marathi often puts the song out of reach, even for the Marathi speakers, much less the non-Marathi ones. Therefore, I am venturing to put out a a loose English translation of the verses of this poem included in the recorded musical version.  The original Marathi poem by Swa Savarkar जयोस्तुते श्रीमहन्मंगले, शिवास्पदे शुभदे । स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुतां वंदे ।। राष्ट्राचे चैतन्य मूर्त तू नीती-संपदांची । स्वतंत्रते भगवती, श्रीमती, राज्ञी तू त्यांची ।। परवशतेच्या, नभात तूची आकाशी होसी । स्वतंत्रते भगवती, चांदणी चमचम लखलखसी ।। वंदे, त्वामहं यशोयुतां वंदे । गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली । स्वतंत्रते भगवती, तूच जी विलसतसे लाली ।। तू सूर्याचे तेज, उदधीचे गांभीर्यहि तूची । स्वतंत्रते भ...

Khemchand Prakash : dil ne phir yaad kiya

When writing about Khemchand Prakash, one question is hard to escape. Most people will name him as one of the pioneers, one of the giants of the golden era of the Hindi Film Music. Yet most lay listeners will have heard very little of what he actually composed, save आयेगा आनेवाला from Mahal and perhaps दिया जलाओ from Tansen.  The question therefore is, ‘Why do people hold Khemchand Prakash in such a high regard as a composer?’  Mortal Men Immortal Women In 1982 Noorjehan visited India, first time in 35 years after the Partition. Who’s who of the Hindi Film Industry had gathered to celebrate this great re-union and to roll out a red carpet to this beloved singer. The program was wonderfully conceived. It was a retrospect of the journey of the Hindi Film Music. The program had many high points, but for me, two of them stood out the most prominently. The first was of course, Noorjehan’s appearance on the stage and her rendition of 'आवाज दे कहा है'. It made a mockery of the artifi...