Skip to main content

Swa. Savarkar's Ode to Liberty - jayostu te shri mahanmagale


On this happy occasion of India's 78th Independence day, sharing a loose translation of a great Marathi poem by Swatantryaveer Vinayak Damodar Savarkar. This poem and its musical avatar have both been quite famous in the Marathi world. However, the difficulty in accessing its rich and poetic Marathi often puts the song out of reach, even for the Marathi speakers, much less the non-Marathi ones. Therefore, I am venturing to put out a a loose English translation of the verses of this poem included in the recorded musical version. 


The original Marathi poem by Swa Savarkar

जयोस्तुते श्रीमहन्मंगले, शिवास्पदे शुभदे ।

स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुतां वंदे ।।

राष्ट्राचे चैतन्य मूर्त तू नीती-संपदांची ।
स्वतंत्रते भगवती, श्रीमती, राज्ञी तू त्यांची ।।
परवशतेच्या, नभात तूची आकाशी होसी ।
स्वतंत्रते भगवती, चांदणी चमचम लखलखसी ।।

वंदे, त्वामहं यशोयुतां वंदे ।

गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली ।
स्वतंत्रते भगवती, तूच जी विलसतसे लाली ।।
तू सूर्याचे तेज, उदधीचे गांभीर्यहि तूची ।
स्वतंत्रते भगवती, अन्यथा ग्रहण नष्ट तेची ।।

वंदे, त्वामहं यशोयुतां वंदे ।

मोक्ष-मुक्ति ही तुझीच रूपे तुलाच वेदांती ।
स्वतंत्रते भगवती, योगिजन परब्रम्ह वदती ।।
जे जे उत्तम उदात्त उन्नत महन्मधुर ते ते ।
स्वतंत्रते भगवती, सर्व तव सहचारी होते ।।

वंदे, त्वामहं यशोयुतां वंदे ।

हे अधम-रक्तरंजिते, 
सुजन पूजिते, 
श्रीस्वतंत्रते । 

तुजसाठि मरण ते जनन । 
तुजवीण जनन ते मरण ।।

तुज सकल चराचर शरण ।

वंदे, त्वामहं यशोयुतां वंदे ।

**************
Oh Auspicious One, 
the Pure One, 
the Bestower of Piety, 
O Goddess Liberty! 

I worship thee, O Victorious One! 

Very soul of a nation's vitality, 
You are the Queen of all those 
with the wealth of virtue and integrity

In the dark nights of despair and slavery  
you are the guiding star  
In the firmament, shining brightly

O Goddess Liberty! 

I worship thee, O Victorious One! 

On a cheek as delicate as a flower, 
Or on a flower as soft as a cheek, 
You are the blush radiating there

You are the brilliance of the Sun,
And the profundity of the Ocean.
They are but eclipsed without thee

O Goddess Liberty! 

I worship thee, O Victorious One!

Moksha or Mukti is your appellation,
And its you, whom the Yogis and the Vedantins
know as the One - Parabrahman!

All that excels and rises, 
All that's upstanding and noble, 
All that's ever so sweeet, becomes your companion

O Goddess Liberty! 

I worship thee, O Victorious One!

You are bathed in the blood of the villains
And worshipped by the people of virtue

Death for thee is the very life
and life without thee, but death

The whole universe surrenders to thee, 

O Goddess Liberty! 

I worship thee, O Victorious One!
************
By Swatantryaveer Vinayak D Savarkar
(English Translation - Sushrut Vaidya)


The song was composed by late Madhukar Golwalkar and sung by Lata, Meena, Usha and Hridaynath Mangeshkar. 


Comments

Popular posts from this blog

दो अंतरों के बीच में…

पीछे   रेडियो पे   गाना चल रहा है.... हाथ थे मिले की   जुल्फ   चाँद की सवार दूँ होठ   थे खुले की हर बहार को   पुकार   दूँ दर्द था दिया गया की हर दुःखी को प्यार दूँ और सांस यों की स्वर्ग भूमि पर उतार दूँ                     और   मैं   सोच रहा हूँ....                     जो यकीनन पाया उसका ,                     जो शायद पाया होगा उसका भी ,                     जो पा सकते थे... नही पाया , लेकिन उसकी   जानिब   दो कदम चले तो सही                     इसी खुशी का एहसास ,                     खुद ही खुद को , बिना-थके ,  दिलाते   रहने का ही                     जश्न मनाने के इस  ...

तुझिये निढळीं...

हे संत ज्ञानदेवांचं भजन - तुझिये निढळीं... एका प्रकट कार्यक्रमात बालगंधर्वांनी गायलेलं ध्वनिमुद्रण आहे हे.  जुनं आणि प्रकट कार्यक्रमातलं असल्यामुळे फार चांगलं नाहीये. पण त्याच्या सगळ्या बाह्य दोषांतून आणि मर्यादांतूनही त्याचं सौंदर्य आणि त्याची शक्ती दोन्ही पूर्ण प्रकट होतात हा माझा अनुभव आहे.  हे म्हणजे वेरूळच्या आजच्या भग्न मूर्तीकडे पाहावं आणि ती तिच्या मूळ स्वरूपात दिसावी तसं आहे थोडंसं... भगवंतांनी गीतेत म्हंटलं आहे - यः पश्यसि स पश्यसि - ज्याला दिसतं त्याला दिसतं.... तसं काहीसं.  ही चाल मास्तरांची... मा. कृष्णरावांची... आहे. त्यांची स्वतःची या गाण्याची उत्तम ध्वनिमुद्रण असलेली ध्वनिमुद्रिका आहे. माझ्याकडे आहे.  छान आहे.   पण हे ऐकल्यानंतर पुन्हा 'त्यांचं' ऐकावं अशी इच्छा मला झालेली नाही.  संगीतकाराने स्वतः गायलेलं गाणं हे कोणत्याही गायकाने गायलेल्या आवृत्तीपेक्षा सरस असतं म्हणतात. शंभरातल्या नव्व्याण्णव वेळा ते खरंही आहे. पण काही गायकांच्या गळ्याला अद्भुताचा, परतत्त्वाचा स्पर्श असतो. त्यातून व्यक्त होणारा आवाज त्या स्पर्शामुळे एक वेगळी अनुभूती दे...

पं. कुमार गंधर्व आणि भा. रा. तांबे

सखोल, मूलगामी  चिकित्सा; स्वतंत्र विचार; आपण जे करतो ते ‘का’ करतो याची पक्की जाणीव; कोणत्याही प्रभावापुढे डगमगून न जाता ह्या जाणिवेवर ठाम राहण्याची ‘निर्भय साधना’; आणि ह्या सर्वांबरोबर अतिशय प्रभावी, कलात्मक व सौंदर्यपूर्ण सृजन करू शकणार्‍या; अक्षरशः एका हाताच्या बोटावर मोजता येतील अशा महान कलाकारांमधे कुमारजींचा समावेश होतो. त्यांच्या सर्वस्पर्शी व्यासंगाला आणि कुतुहलाला कोणताही विषय वर्ज्य नव्हता. कुमारजींच्या प्रत्येकच प्रस्तुतीत त्यांच्या ह्या सर्वस्पर्शी व्यासंगाचे दर्शन व्हायचे. विषयवस्तूची मांडणी साकल्याने, सर्व बाजूंनी विचार करून केलेली असायची. त्यात वर्षानुवर्षे गृहित धरलेल्या विचारांना छेद देऊन, अतिशय आनंददायक असा नवा विचार देण्याचे सामर्थ्य होते. ह्या सामर्थ्यामुळेच कुमारांचे रसिकांच्या मनात एकमेवाद्वितीय असे स्थान आहे. त्यांनी लोकांसमोर मांडलेले कवी-दर्शनाचे कार्यक्रमही ह्याला अपवाद नव्हते. कुमारजींनी भारतीय परंपरेतील अनेक कवींच्या रचना रसिकांपुढे सादर केल्या. ह्यात अनेक संत-कवींचा समावेश होता. मात्र ह्या मालिकेतील प्रत्येक संत -  कबीर, मीरा, सूरदास, तुलसीदास व तुक...