Skip to main content

Posts

Showing posts from April, 2026

आशाताई (आणि लताबाई)...

आपल्याकडे षड्‍दर्शनांची परंपरा आहे. त्यात आस्तिक आणि नास्तिक अशी सहा-सहा दर्शनं मानली आहेत. त्या दर्शनांमध्ये त्या काळात तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात जो सर्वोच्च विचार झाला त्याची वेगवेगळ्या दृष्टीने केलेली मांडणी आहे, त्या विचाराच्या वेगवेगळ्या पैलूंच ‘ दर्शन ’ आहे.  हिंदी चित्रपटसंगीताच्या सुवर्णयुगात जे पुरुष आणि स्त्री गायक होऊन गेले, त्यांनीही स्त्री आणि पुरुषांच्या भावनिक अभिव्यक्तीच्या सर्वोच्च पातळीच्या वेगवेगळ्या पैलूंचं दर्शन आपल्या गाण्यातून लोकांना घडवून दिलं. तेव्हा त्या दर्शनांसारखी आपण यातलीही सहा पुरुष आणि सहा स्त्री दर्शनं निवडली तर? निकष अर्थातच हा, की आपल्या असामान्य अश्या अंगभूत गुणांनी, आणि अगणित कष्टांनी त्यांनी त्या क्षेत्रात सर्वोच्च असं काय करणं शक्य आहे ते आपल्या कर्तृत्वानं दाखवून दिलेलं असावं. अशी निवड करायची म्हंटलं तर पुरुष गायकांमध्ये रफी, मुकेश, किशोर, हेमंत, तलत, आणि मन्ना डे या सहा जणांचा समावेश होईल याबद्दल फारसे मतभेद असण्याचं कारण नाही. स्त्री गायकांमध्ये माझ्या यादीत, लता, नूरजहाँ, काननदेवी, आशा, शमशाद आणि गीता यांचा समावेश मी करेन. अर्थातच हा...