Skip to main content

Posts

Showing posts from October, 2022

पं. कुमार गंधर्व आणि भा. रा. तांबे

सखोल, मूलगामी  चिकित्सा; स्वतंत्र विचार; आपण जे करतो ते ‘का’ करतो याची पक्की जाणीव; कोणत्याही प्रभावापुढे डगमगून न जाता ह्या जाणिवेवर ठाम राहण्याची ‘निर्भय साधना’; आणि ह्या सर्वांबरोबर अतिशय प्रभावी, कलात्मक व सौंदर्यपूर्ण सृजन करू शकणार्‍या; अक्षरशः एका हाताच्या बोटावर मोजता येतील अशा महान कलाकारांमधे कुमारजींचा समावेश होतो. त्यांच्या सर्वस्पर्शी व्यासंगाला आणि कुतुहलाला कोणताही विषय वर्ज्य नव्हता. कुमारजींच्या प्रत्येकच प्रस्तुतीत त्यांच्या ह्या सर्वस्पर्शी व्यासंगाचे दर्शन व्हायचे. विषयवस्तूची मांडणी साकल्याने, सर्व बाजूंनी विचार करून केलेली असायची. त्यात वर्षानुवर्षे गृहित धरलेल्या विचारांना छेद देऊन, अतिशय आनंददायक असा नवा विचार देण्याचे सामर्थ्य होते. ह्या सामर्थ्यामुळेच कुमारांचे रसिकांच्या मनात एकमेवाद्वितीय असे स्थान आहे. त्यांनी लोकांसमोर मांडलेले कवी-दर्शनाचे कार्यक्रमही ह्याला अपवाद नव्हते. कुमारजींनी भारतीय परंपरेतील अनेक कवींच्या रचना रसिकांपुढे सादर केल्या. ह्यात अनेक संत-कवींचा समावेश होता. मात्र ह्या मालिकेतील प्रत्येक संत -  कबीर, मीरा, सूरदास, तुलसीदास व तुक...

दर्शन

एखादी गोष्ट आपल्या डोळ्यांसमोर आली तर ती आपल्याला ‘दिसली’ असं आपण म्हणतो. पण काही गोष्टींच्या बाबतीत निव्वळ ‘दिसणं’ हा शब्दप्रयोग पुरेसा वाटत नाही. अश्या गोष्टींचं दिसणं नुसतं आपल्याला त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून देतं इतकच नाही तर दृष्टीच्या द्वारे आपल्या मनावर काही ‘संस्कार’ करून जातं. हा संस्कार बीजरूपाने झाला तरी नंतर वर्षानुवर्षे त्याचा आपल्या आत वृक्ष होत राहतो. हे केवळ ‘दिसणं’ नसतं, तर ते ‘दर्शन’ असतं. पंढरपूरला पहिल्यांदा गेलो तेव्हा रांगेतून चालत होतो. ही रांग अशीच अजून बराच काळ चालणार असं वाटत असतानाच अचानक एका वळणानंतर प्रत्यक्ष पाण्डुरङ्गच समोर आला होता. काल तसंच गाडीतून जाता-जाता; हिमालयाचं जंगलांनी भरलेलं हिरवं हिरवं रूप पाहत असतानाच, एका वळणावर, ‘तो’ असाच त्याच्या हिमाच्छादित, भव्य, ‘पाण्डुरङ्ग’ रूपातच समोर आला. क्षितिजावर दृष्टी जाईल तिथपर्यंत त्याचं ते विश्वरूप पसरलेलं होतं. मी बर्फाच्छादित महापर्वत काही पहिल्यांदाच पाहात नव्हतो. याआधी मी आल्प्स आणि रॉकीज पाहिले होते, त्यात फिरलो होतो. त्यांचं सौंदर्य, त्यांची भव्यताही अद्भुतच आहे. पण हिमालयात दिसलं ते ‘पावित्र्य’,...