एखादी गोष्ट, ओळ, कविता, सुभाषित किंवा इतर तपशील, स्मरणात ठेवण्याच्या आपल्या स्वतःच्या प्रक्रियेचा आपण किती वेळात जाणीवपूर्वक विचार करतो? म्हणजे ज्या गोष्टी आपल्या लक्षात राहतात त्या ‘का’ राहतात? त्यासाठी आपण काय केलेले असते? ते इतर गोष्टींच्या बाबतीत आपल्याला हुकमी पद्धतीने करता येऊ शकते का? येऊ शकेल का? तसेच या उलट, ज्या गोष्टी आपली इच्छा असूनही लक्षात राहत नाहीत त्या ‘का’ राहात नाहीत? या व अशा प्रश्नांचा यात समावेश होईल माझ्या स्वतःच्या बाबतीत हा विचार करू जाता मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे जी गोष्ट लक्षात ठेवायची, त्याची काही तार्किक संगती लागल्याशिवाय ती गोष्ट माझ्या लक्षात राहात नाही. विशेषतः काव्यपंक्तिंच्या किंवा सुभाषितांच्या बाबतीत, अनेक वेळा गद्य वाक्यांच्या, थोरामोठ्यांच्या उक्तिंच्या बाबतीत सुद्धा, त्या लक्षात ठेवण्याची प्रक्रिया बहुदा पुढील प्रमाणे होते - मूळ वाचनाचा / पंक्तींचा अर्थ समजावून घेणे त्यामधील विचारांचा प्रवाह कसा वाहतो त्याचे आकलन करून घेणे त्या प्रवाहाचे जे काही नैसर्गिक विभाग होतात, ते विभाग, म्हणजेच पंक्तिंचे तुकडे समजून घेणे त...
Extroversions of an Introvert Mind