Skip to main content

Posts

Showing posts from 2021

राजा शिवछत्रपती आणि बाबासाहेब

मी शाळेत असताना जे लेखक वाचत मोठा झालो, ज्यांची पुस्तकं वेड्यासारखी वाचली, परत-परत वाचली, ज्यांनी माझं लहानपण अक्षरश: घडवलं, त्या हाताच्या बोटांवर मोजण्यासारख्या चार-पाच लेखकांमध्ये बाबासाहेब होते. त्यांचं ‘राजा शिवछत्रपती’ मी इतक्या वेळा वाचलंय की त्याला गणतीच नाही. माझ्याकडे आज असलेली त्याची प्रत, ही तिसरी प्रत आहे. त्याच्या पहिल्या दोन प्रती मी इतक्या वेळा वाचल्या आहेत, की वाचून-वाचून त्याचं पान अन् पान सुटं होऊन त्या खराब झाल्या. तिसर्‍या प्रतीचीही अवस्था काही फार वेगळी नाहीये. इतिहास म्हणजे काय? इतिहासाचा अभ्यास कसा करायचा असतो? त्याच्यातलं खरं-खोटं काय? पुरावे कोणते? त्याच्या मागच्या राजकीय विचारधारा काय आहेत? इतर सिद्धांत कुठले? हा सगळा विचार खूप-खूप नंतर आला. या सगळ्याच्या आधी 'शि-वा-जी' या तीन अक्षरांबद्दल प्रेम, आदर, आपलेपणा, खरं तर भक्ती निर्माण करण्याचं काम बाबासाहेबांच्या 'राजा शिवछत्रपती'ने केलं. शिवाजी महाराजांना आमच्या आयुष्याचाच नाही तर, व्यक्तिमत्वाचा, अगदी रक्ताचा भाग बनवण्याचे काम या पुस्तकाने केलं. त्या काळात वाचलेल्या कुठल्याही खऱ्या किंवा काल्पनिक...

सुमनआत्या...

वडीलधार्‍या माणसांच्या संस्काराचे मोल कळण्यासाठी आपल्या स्वत:ला , बहुधा, अगदी वडीलधारे नाही , पण किमान प्रौढ तरी व्हावे लागते. दुर्दैव हे , की तो पर्यंत आपल्यावर   संस्कार करणारी वडीलधारी माणसे वृद्ध झालेली असतात , आणि अनेकदा कायमची निघूनही गेलेली असतात. त्या संस्कारांचे ऋण त्यांच्यापुढे व्यक्त करणे मग राहून जाते , ते कायमचेच. २८ जूनला आत्या गेली. जवळजवळ सहस्रचंद्रदर्शन करून , नंतर एका फार मोठ्या आजाराला वर्ष-दीड वर्ष मोठ्या धैर्याने तोंड देऊन गेली. मिळालेल्या दीर्घायुष्याचा , मला ठाऊक असलेल्या बहुतेकांपेक्षा, अधिक चांगला उपयोग करून गेली. पण तरीही तिने केलेल्या संस्कारांचे ऋण व्यक्त करण्याचे राहूनच गेले. आत्या ‘उच्चविद्याविभूषित’ म्हणतात तशी होती. इतकंच नव्हे तर संशोधक, विचारवंत आणि शिक्षणतज्ञ होती. एखाद्या विषयाची साग्रसंगीत , सांगोपांग , सखोल , तर्क-विवेकाने , चिकित्सा करून ती अभ्यासपूर्ण भाषेत मांडणारी होती. अर्थातच तिने मला शिकवलेल्या गोष्टींमध्ये वैचारिक , बौद्धिक गोष्टी तर होत्याच. पण मी तसा, लौकिकार्थाने, डॉ. सुमन करंदीकरांचा विद्यार्थी नाही. ‘आपणच’शी माझा संबंध असला तरी...