एखादी भाषा राष्ट्रभाषा केली म्हणजे ती वापरली जायलाच हवी असे का? ते स्थान केवळ प्रतिकात्मक किंवा एकूण इतिहासाचा / संस्कृतीचा विचार करता दिलेल्या सन्मानाचे स्थान असू शकत नाही का? थोडं गमतीनं सांगायचं तर – आपला राष्ट्रीय प्राणी वाघ आहे म्हणून तो प्रत्येकाने पाळावा अशी अपेक्षा त्या सन्मानामागे आहे का? किंवा तो संख्येने सर्वाधिक असलेला प्राणी असला पाहिजे असा अट्टाहास आपण धरतो का? राष्ट्रभाषा ही भावनिक गोष्ट आहे – व्यावहारिक नाही – ही गोष्ट मुळात लक्षात घ्यायला हवी असे मला वाटते. संस्कृत व्यवहारात स्वीकारावी, किंवा शासनाने ती स्वीकारली जावी यासाठी काही विशेष प्रयत्न करावे असे मी म्हणत नाही. व्यावहारिक अर्थाने कोणतीही भाषा भारत ‘राष्ट्रभाषा’ म्हणून स्वीकारू शकत नाही हे आपल्यातील विविधतेमुळे उघड आहे. पण तो मूळ मुद्दा नाहीच आहे. व्यवहारात लोक व्यवहाराला योग्य ती भाषाच वापरतात. उद्या सर्वाधिक पगाराची नोकरी मिळविण्यासाठी संस्कृतच्या ज्ञानाची गरज निर्माण झाली तर आज आयआयटी चे क्लासेस चालवणारे तत्काळ संस्कृतचे क्लासेस चालवायला लागतील. व सगळे विद्यार्थी ही चर्चा बंद करून तिकडे...
Extroversions of an Introvert Mind